Friday, 7 April 2023

सुगंधी उटणे व आकाशकंदील तयार केले.

विभागाचे नाव – गृह आणि आरोग्य  

इयत्ता – नववी व दहावी    

दिनांक - 19-10-2022

प्रात्यक्षिकाचे/प्रकल्पाचे/उपक्रमाचे नांव : सुगंधी उटणे व आकाशकंदील तयार केले.

दिवाळी सनानिमित्त आयबीटी विद्यार्थ्यांनी सुगंधी उटणे व आकाशकंदील तयार करून आयबीटी Stall च्या माध्यमातून सुगंधी उटणे व आकाशकंदील विक्री केले.

यामध्ये विद्यार्थ्यांना कॉस्टिंग, पॅकिंग, लेबलिंग व मार्केटिंग इ. कौशल्ये प्राप्त झाली.








सिमेंट, क्रशर व वाळू वापरून कोबा तयार केला.

विभागाचे नाव – अभियांत्रिकी  

इयत्ता – दहावी  

दिनांक - 07-10-2022

प्रात्यक्षिकाचे/प्रकल्पाचे/उपक्रमाचे नांव : सिमेंट, क्रशर व वाळू वापरून कोबा तयार केला.

विद्यार्थांनी शाळेच्या पोषण आहार शेडसाठी सिमेंट, क्रशर व वाळू वापरून कोबा तयार केला. यामध्ये

विद्यार्थ्यांना गवंडी कामाची सर्व कौशल्ये प्राप्त झाली.






चिक्की तयार केली.

विभागाचे नाव – गृह आणि आरोग्य  

इयत्ता – नववी   

दिनांक - 18-08-2022

प्रात्यक्षिकाचे/प्रकल्पाचे/उपक्रमाचे नांव : चिक्की तयार केली.

विद्यार्थांनी शेंगदाणे, गुळ व तूप हे साहित्य वापरून चिक्की तयार केली. यामध्ये विद्यार्थ्यांना

पाककलेतील चिक्कीसाठी एकतारी, गोळीबंद पाक कसोटी इ. कौशल्ये प्राप्त झाली.





ब्लोअर व फॅन दुरुस्त केला.

विभागाचे नाव – उर्जा आणि पर्यावरण

इयत्ता – आठवी व दहावी

दिनांक - 01-10-2022

प्रात्यक्षिकाचे/प्रकल्पाचे/उपक्रमाचे नांव : ब्लोअर व फॅन दुरुस्त केला.

विद्यार्थ्यांनी शाळेचा ब्लोअर व फॅन दुरुस्त केला.







रक्षाबंधन- राख्या तयार केल्या.

विभागाचे नाव – गृह आणि आरोग्य  

इयत्ता – नववी   

दिनांक - 02-08-2022

प्रात्यक्षिकाचे/प्रकल्पाचे/उपक्रमाचे नांव : रक्षाबंधन- राख्या तयार केल्या.

Helpers of the handicapped, Kolhapur. या आमच्या दिव्यांग लोकांसाठी कार्य करणाऱ्या संस्थेमार्फत

शाळेतील आयबीटी विद्यार्थ्यांनी रक्षाबंधन –उपक्रमांतर्गत भारतीय सीमेवरील जवानांसाठी तब्बल ३०० राख्या बनवल्या.





डुप्लेक्स पेपरचा वापर करून फुले व गुच्छ तयार करणे :

प्रात्यक्षिकाचे/प्रकल्पाचे/उपक्रमाचे नांव : डुप्लेक्स पेपरचा वापर करून फुले व गुच्छ तयार करणे :

विभागाचे नाव – गृह आणि आरोग्य  

इयत्ता : आठवी, नववी व दहावी

थोडक्यात माहिती :

 गृह आणि आरोग्य विभागांतर्गत राबविण्यात आलेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांना डुप्लेक्स पेपरचा वापर करून फुले व गुच्छ तयार करण्यास शिकविले जाते. प्रामुख्याने या फुलांचा व गुच्छचा वापर आम्ही शाळेत विविध  कार्यक्रमासाठी शाळेत येणाऱ्या विशेष पाहुण्यांना देण्यासाठी होतो. विद्यार्थी या फुलांचा वापर घरामध्ये फ्लॉवरपॉटमध्ये ठेवण्यासाठीही करतात. त्याचबरोबर ही फुले व गुच्छची आयबीटी विभागामार्फत विक्रीही करतो. 


या फुलांच्या व गुच्छच्या विक्रीमधून आयबीटी विभागासाठी खूप चांगल्या प्रकारे नफा झाला आहे.